जिवन म्हटलं की त्यात सुख आणि दुःखाचे चक्र आलेच,जिवन-मृत्युचे कालचक्रही आलेच,चांगले-वाईट माणसंही आहेतच,चांगल्या-वाईट  घटना व त्यांच्यापासून मिळालेल्या चांगल्या-वाईट आठवणी हे सर्व आलंच. खरंतर या शिवाय जिवनाचे महत्वच राहणार नाही आणि प्रत्येक मानवाला सुखी-समृद्धी जिवनाची इच्छा असते.त्यासाठी तो वाटेल ते करत असतो, आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत असतो.

https://www.khadedipak.com
आयुष्यात आरोग्याचं महत्व 


प्रत्येक मनुष्याचे जिवन जगण्याची एक विशिष्ट पद्धत त्याने स्वतालाच ठरवून दिलेली असते.ठरलेल्याप्रमाणे त्याचे मन व बुद्धी त्याचप्रमाणे कार्य करत असतात. जिवन म्हटलं की जन्म  आणि मृत्यू, जन्माला येताना मृत्युलाही स्विकारावेच लागते. जन्म आणि मृत्यू हे तर अटळच आहे,पण यामध्ये एक ठराविक कालावधी असतो,जो की प्रत्येकाला वेगळा असतो याच कालावधीला आयुष्य म्हणतात. पण आपल्याला आयुष्याचं काय पडलय, आपण तर या आयुष्याची कदर तर कधीच केली नाही, तर मग या आयुष्याचं सोनं काय करणार. काही मोजक्याच लोकांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं आणि देशाचे नाव केलं आणि इतिहासात आपले नाव अमर करुन गेलेत. ते ही मनुष्यच होते ना?, त्यांच्यावेळची सामाजिक,आर्थिक परिस्थिती खुप बिकट असताना त्यांनी संघर्ष करने सोडला नाही व त्याचे मधुर फळ त्यांना मिळत गेले. सांगायचे एवढेच की आजच्या मानवाला आयुष्य कसे जगायचे याचा विसर पडला असावा असे दिसते.

https://www.khadedipak.com
आरोग्याचं महत्व 

उत्तम आरोग्याचं आपल्या आयुष्यात महत्व:

आजच्या धकाधकीच्या व धाळपळीच्या जिवनामध्ये आपल्याला स्वताच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच राहिलेला नाही किंवा असंही म्हणायला जागा आहे की आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वच देत नाही. काम आणि काम एवढेच एक लक्ष या आपण ठरवलेलं आहे, पण प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ज्याच्यासाठी आपण काम करतोय,मेहनत करतोयं,कष्ट करतोयं, राबराब राबतोय ,मात्र त्याच आरोग्याकडे दुर्दैवाने आपण दुर्लक्ष करत आहोत. आपल्या अत्यंत व्यस्त जिवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही किंवा बरयाचदा वेळच मिळत नसल्याच्या तक्रारी करत असतो. आज आपल्याला सर्वात महत्वाची संपत्ती ही पैसा,रूपये हीच वाटतात पण आपल्याला विसर पडत चाललेला आहे की फक्त पैशे किंवा वास्तूच आपली संपत्ती नाही आहे. आपल्यासाठी सर्वात महत्वाची संपत्ती जर असेल तर ती आपले "निरोगी आरोग्य", होय हीच आपली मुख्य संपत्ती असायला हवी, कारण तुमचे आरोग्य चांगले असेल तर पेशे कधिही कमवता येऊ शकतो, पण चांगले आरोग्य कमवता येत नाही. त्यासाठीच माझे प्रत्येक व्यक्तीस कळकळीची विनंती आहे की,"बाबांनो स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका,मिळालेल्या आयुष्याचे सोने करा,आरोग्य हीच खरी संपत्ती आहे तिचा आदर करा".

https://www.khadedipak.com
Lifestyle

उत्तम आणि निरोगी आरोग्य जर असेल तर अनेक प्रकारचे आपण काम करू शकतो. काम करत असताना थकवाही जाणवणार नाही, आपल्या कामात सदैव आपले मन लागून राहील. निरोगी आरोग्य नेहमी आपली क्षमता वाढवण्यात मदत करत असते.शरीर जास्त प्रमाणात थकत नसल्याने आपण उत्तमरीत्या आपले काम पुर्ण करु शकतो. सर्वात महत्त्वाचे सांगायचे झाले तर, शहरी भागातील जिवन व ग्रामीण भागातील जिवन यात मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो. दैनंदिन जिवन दोन्ही भागात वेगवेगळ्या पद्धतीने असते एवढेच नाहीतर शारीरिक व मानसीक कामाचेही वेगळेच आहे.याचा आपल्या शरीरावर व आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर फरक पडलेला दिसून येते हे नक्कीच.

https://www.khadedipak.com
Importance of Fitness

शहरी भागातील दैनंदिन जिवनाचा आरोग्यावर होणारा परिणाम:

शहरात दैनंदिन जिवन जगताना खुपकाही मन मारून करावं लागते. मनाच्या विरुद्ध जाऊन, इच्छा नसताना कामे करावी लागतात. सर्वात महत्वाचं, सकाळी सुर्योदयापुर्वी खुपच कमी लोक उठतात. शारीरिक व्यायाम (कसरत) करायला वेळच नसतो किंवा आपण वेळच काढत नाही. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यानंतर पहाटे कसंकाय जाग येणार. वेळ मिळत नाही म्हणून आपण वेळ टाळतो आणि आरोप करतो की वेळ मिळत नाही. खरंतर आपल्याला वेळ द्यायला आवडत नाही, सकाळी शहरात शुद्ध हवेत फिरायला जायचे असेल तर पहाटेच उठले पाहीजे पण आपल्याला पहाटे लवकर उठण्याचा तर खूपच कंटाळा. दररोज दहा ते बारा तास काम एक-दोन तास प्रवास यामुळे शारीरिक व मानसिक थकवा येतो व शारीरिक कसरत, फिरणे यासाठी कंटाळा येतो व शरीराला यासर्व गोष्टींची सवय रहात नाही. फक्त आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराचा सामना आपल्याला करावा लागतो.

https://www.khadedipak.com
Importance of Yoga

ग्रामीण भागातील दैनंदिन जिवन:

शहरी भागातील जिवनाच्या अगदी उलट ग्रामीण भागाचे दैनंदिन जिवन आहे. इथे बहुतांश  लोकं पहाटे सुर्योदयापुर्वी उठुन शारीरिक कसरत करण्यासाठी महत्व देतात. शरीर आणि आरोग्य  चांगले ठेवण्यास प्राथमिकता देतात. शारीरिक मेहनत जास्त असते,शरीराला काम करण्याची सवय असल्यामुळे रात्री लवकर झोप लागते त्यामुळे पहाटे लवकर उठण्यास कंटाळा येत नाही. आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोपही मिळते त्यामुळे शहरातील जिवनापेक्षा ग्रामीण जिवन आरोग्यासाठी जास्त लाभदायक दिसते. शहरातील लोक सुट्या घालवण्यासाठी ग्रामीणभागाकडे जाण्यासाठी उत्सुक असतात. 

वेळातवेळ काढुन आपल्या आरोग्य जपण्यासाठी वेळ जरूर काढावा. सुरुवातीला कंटाळा नक्कीच येईल पण सातत्य राखल्यास तीचे रुंपांतर हे सवयीमध्ये होईल व याचा फायदाच आपल्याला होणार हेही तेवढेच खरे आहे.

"घेऊया काळजी आपल्या आरोग्याची, करूया शपथ निरोगी राहण्याची".No comments:

IF YOU LIKE OUR POST ,PLEASE COMMENT

Powered by Blogger.