कोरोनाने संपुर्ण विश्वात आपले थैमान घातलेले आहे. कोरोना विषाणू बद्दलची माहीती जी सरकार तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगत आहे . साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अजुन जगण्याची इच्छा शिल्लक असेल तर घरी बसा. देशाला तुमच्या समजुतदारपणाची आज आवश्यकता आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री,देशाचे पंतप्रधान आपणांस घरी राहण्यासाठी आग्रह करतआहे. जगातील प्रगत देशांची आज काय स्थिती आहे माहीत आहे ना. मग का आपल्या आणि इतरांच्या जीवांशी खेळताय.

https://www.khadedipak.com
घरात राहूनच कोरोनावर करू शकतो आपण मात

आज संपुर्ण विश्वात मृत्युचा नंगा नाच सुरू आहे. जी परिस्थिती बाकीच्या देशात उद्भवलेली आहे, तीच स्थिती आपल्या देशात उद्भवू नये, यासाठी प्रशासन, डाॕक्टर,सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालुन तुमच्यासाठी बाहेर आहे. ते लोक आपली मदत करण्यासाठी आपल्या परिवारापासून दूर आहेत. त्यांना तुम्हीही मदत करू शकता. जास्त काही नाही ,फक्त घरात थांबा. आता संपुर्ण देशात संचारबंदी लागू आहे. सायंकाळी ५ वा. टाळ्या वाजवून आपल्यासाठी काम करत असलेल्या कर्मचारी,डाॕक्टर,पोलीस प्रशासन यांना मान द्यायचा होता. आपल्यातीलच काही बेजबाबदार लोक चुकीचा अर्थ काढून चक्क गर्दी केली. रस्त्यावर उतरून ढोल- ताशांच्या गजरात जल्लोश साजरा केला. स्वताचे मनोरंजन करण्यासाठी रस्त्यावर येऊन गर्दी केली. आता तरी डोळे उघडून बघा. परिस्थितीचे गांभिर्य ओळखा आणि घरी बसा.

कोरोना विषाणू बद्दलची माहीती
Stay at home for your safety

असे असतानाही काही बेजबाबदार लोक बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहे. या रोगाने नक्कीच काहीतरी मोठी हानी होऊ शकते. याचे प्रमाण आहे आज संपुर्ण देशात संचारबंदी. आपण ऐवढे निष्काळजीपणाने का वागतोय हेच कळत नाही. कोरोनाचे गांभिर्य अजुनही आपल्या देशवासीयांना कळालेलं नाही असंच चित्र दिसत आहे. सरकारने घरात राहुन स्वताची व परिवाराची काळजी घेण्याचे सांगितलेले आहे हे माहीत असताना आपण घराबाहेर पडतोय. का?,कशासाठी? अरे बाबांनो जीव असेल तर उरलेली कामे नंतरही करता येईल. 

https://www.khadedipak.com
जगण्यासाठी आज घराबाहेर निघु नका

जर जगण्याची थोडीफार इच्छा शिल्लक असेल तर घरी थांबा. घरीही आपल्या परिवारातील सदस्यांशी अंतर ठेवा. किमान एक मिटर अंतर अपेक्षित आहे. हे सर्व तुमच्याच भल्यासाठी आहे हे ध्यानात असू द्या. पुढील काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपुर्ण आहे. तुम्हाला जर प्रशासनाची मदत करायची असेल तर घरीच थांबा. तुम्ही घरी राहील्यानेच प्रशासनाची खुप मोठी मदत होईल. संचारबंदी लागू झाली म्हणून लगेचच जीवनापयोगी वस्तूंचा साठा करण्यासाठी बाहेर गर्दी करू नका. उगाचच या रोगाला आमंत्रण देऊ नका. याचा संसर्ग खुप झपाट्याने वाढतोय लक्षात ठेवा. 

तुम्हाला घरात राहा असं सांगण्याचं एकच कारण आहे,ते म्हणजे तुम्हाला सुरक्षित ठेवणं. तुम्ही घरात राहील्यानेच या रोगावर नियंत्रण होऊ शकते. नविन संसर्ग होण्यापासून थांबवता येऊ शकते. बाहेर आल्याने आपल्याला कशामार्फत संसर्ग होईल हे सांगणे कठीण आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडणे हाच आजच्या घडीला एकमेव उपाय आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना फोन करून घरीच थांबण्यासाठी विनंती करा. सरकारला, प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आग्रह करा.

https://www.khadedipak.com
घरी बसण्यातच खरं शहाणपण आहे

आपल्याला पुढील २१ दिवस घरातच रहायचे असे मनाशी ठरवून घ्या. सरकारला अजून कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका. सरकारला तुमची काळजी तुमच्यापेक्षा जास्त आहे. जे तुम्ही आज बघू इच्छित नाही. सरकारने त्याचे गांभिर्य लक्षात घेऊनच योग्य ती पावले उचलली आहे. आता गरज आहे ती तुमच्या धैर्याची. पुढील किमान २१ दिवस तरी तुमच्या धैर्याची परिक्षाच आहे असं समजा. या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी फक्त घरी थांबायचे आहे. उद्याचा सूर्य पाहण्यासाठी आज तुम्हाला घरी थांबावेच लागेल. या परिस्थितीत घाबरून न जाता त्यावर मात करण्यासाठी स्वताला घरी राहण्यासाठी बाध्य करा. 

जीवन हे ऐक सुंदर आहे, कोरोना त्यावरील मात्र एक डाग. या डागापासून जर वाचायचे असेल तर घरीच थांबलेलं बरं. रस्त्यावरून जात असताना मध्येच एक घाण पाण्याचा डबका आला. आपण त्या डबक्यातून जातो की बाजूने. नक्कीच बाजूने आपण जातो नाहीतर आपले सर्व कपडे खराब होतील. अगदी त्याचप्रकारे तुमचे जीवन म्हणजे तुमचे कपडे. खराब पाण्याचा डबका म्हणजेच कोरोना. आता तुम्ही त्या विषाणुयुक्त डबक्यात जाणार का आपले कपडे(जीवन) वाचवणार. तुमच्या हातातच तुमचे जीवन आहे. तुमच्या जीवनाचे मुल्य ओळखा आणि पुढील काही दिवस घरी राहा. 

कोरोना सुरूवातीला खुप कमी गतीने वाढतो. एकदा याने गती पकडली तर मग खुपच हाहाकार निर्माण होतो. कोरोनाचे लक्षणं सुरूवातीला साधारणच असतात. कालांतराने याचे प्रमाण वाढत जाऊन एक जीवघेण्या रोगात रुपांतर होते. संसर्ग टाळण्यासाठी एकमात्र उपाय शिल्लक आहे तो म्हणजे शांत घरी बसा. घरी बसल्यानेच नविन संसर्ग होण्यापासून थांबवता येईल. आपण सुशिक्षित नागरिक आहात, जबाबदारीने वागा. घरी राहुनच सरकारची तसेच तुमचा आणि तुमच्या परिवाराचा जीव वाचवला जाऊ शकतो. आपल्या परिवाराखातीर घरातच थांबा. तुमचा जीव वाचवण्यात तुमचाच हात असेल. 

कोरोना एक महामारी घोषित झालेली असून या महामारीपुढे उभ्या देशांनी हात टेकलेले आहे. आपल्या मित्रांसाठी,नातेवाईकांसाठी स्वताला घरात ठेवा. एवढे सगळे लोक तुमच्यासाठी कळकळीची विनंती करत आहे. या विनंतीला मान देण्यासाठी म्हणून का होईना घरात थांबा. चार भिंतीच्या आत राहूनच या महामारीचा सामना आणि यावर मात करता येईल. आपल्या व आपल्या परिवारातील सदस्यांच्या जीवाशी खेळू नका. कित्येक जन्माच्या पुण्यानंतर आपल्याला हे मानवी जीवन मिळालेलं आहे. या जीवनाचा आदर करा, सम्मान करा, यावर प्रेम करा. समाजातील लोकांना वाचवण्यासाठी तरी निदान घरी बसा. 

आशा तर आहे की आपण देशाविषयी आपली जबाबदारी ओळखली असेल. आपणही या धरणीचे देणे लागतो. घरी राहूनच आपण आपल्या देशाचे रक्षण करू शकतो. आपले जवान सिमेवर राहुन ज्याप्रकारे देशाचे रक्षण करतात. अगदी त्याच प्रकारे आपल्याला घरी राहुनच आपल्या देशाचे रक्षण करायचे हे ध्यानात घ्या. आजच स्वःत स्वतासाठी नियम बनवा. लक्ष्मणरेषासारखीच आज आपल्या दरवाज्याच्या बाहेर कोरोनारेषा आखा. आपल्या अराध्याचे स्मरण करून शपथ घ्या की मी स्वताच्या, परिवाराच्या व माझ्या देशबांधवांच्या आरोग्याच्या काळजीपोटी या कोरोनारेषाला ओलांडणार नाही. आत्ताच घेतलेली शपथ तुम्हाला नेहमी तुमच्या अराध्येची आठवण करून देईल.

घेतली शपथ, केली शपथ, बसलोय घरात मी आज, 
कोरोनाशी करूनी दोन हाथ, करूया त्यावर मात आज. 
घरात बसलोय म्हणून काय, घाबरलो नाही तुला आज, 
मी ही घरात राहूनच, जिरवेल तुझा माज आज.

येणार नाही बाहेर मी, नको पाहू अंत माझ्या संयमाचा,
घरात राहुनच सर्वजण आपण, करूया पराभव कोरोनाचा.
गेला जीव जरी, घेतलेली शपथ नाही आम्ही मोडणार,
देशबांधवासाठी माझ्या, घर मुळीच नाही सोडणार.

घर मुळीच नाही आम्ही सोडणार, घर मुळीच नाही आम्ही सोडणार. शेवटच्या श्वासापर्यंत मी घर नाही सोडणार.


कोरोना विषाणू बद्दलची माहीती 

आमचा लेख आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नविननविन विषयांवर लिहायला प्रोत्साहन मिळते. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर नक्की करा.

5 comments:

  1. Ghari raha surakshit raha. Stay at home

    ReplyDelete
  2. Stay safe. Don't underestimate covid19. European countries suffering from second wave.

    ReplyDelete
  3. Please stay home, stay safe

    ReplyDelete

IF YOU LIKE OUR POST ,PLEASE COMMENT

Powered by Blogger.