नोवेल कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव मुळे आपला भारत देशच काय तर बहुतांश देशच लाॕकडाऊन झालेले आहेत. यामुळे सर्व जनतेला घरातच थांबण्याच्या सुचना सरकार व प्रशासनानं दिलेल्या आहे. सतत बाहेर काम करत असलेल्या व्यक्तींना घरात राहून वेळ कसा घालवायचा हाच एक मोठा प्रश्न उभा राहीलेला आहे. लाॕकडाऊन असल्यामुळे बाहेर न जाता आपण आपल्या स्वयंपाक घरात जाऊन कुरकुरीत भाकरवडी बनवू शकतो.

https://www.khadedipak.com
कोरोना लाॕकडाऊनमुळे घरी राहुनच कुरकुरीत भाकरवडी कशी बनवायची

घरातील स्त्रिया दररोजच आपल्याला हवे असलेले पदार्थ बनवून खाऊ घालत असतात. आज आपलंही कर्तव्य आहे की, आज आपणही त्यांच्यासाठी काहीतरी पदार्थ बनवूया. तो पदार्थ कसाही बनला तरी तुमची वाह!वाह होणार हे नक्कीच. स्वयंपाक घर सांभाळणंही एक आव्हानच असतं हे पण आपल्या लक्षात येईलच. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भाकरवडी, होय भाकरवडी. आज आपल्याकडे वेळ आहे आणि नवीन शिकण्यासाठी इच्छाबळही आहेच. 

भाकरवडीसाठी लागणारे साहीत्य तुम्हाला सांगणारच आहे शिवाय कृतीसुद्धा सांगणार आहोत. कुरकुरीत भाकरवडीसाठी लागणारे साहीत्य खालीलप्रमाणे आहे.

कुरकुरीत भाकरवडी साहीत्य:


१    एक कप मैदा
२    २ चमचे बेसन पीठ
३    मीठ (चवीनुसार)
४    ३ चमचे गरम तेल
५    १ चमचा जीरे
६    २-३ चमचे तीळ
७    ३-४ चमचे खोबरे किस
८    ३ चमचे बारीक कोथिंबीर 
९    १ चमचा जीरे पावडर
१०  १ चमचा धने पावडर
११   २-३ चमचे लाल पावडर
१२   ४ चमचे बारीक शेव 
१३   १ चमचा साखर

कुरकुरीत भाकरवडी बनवण्यासाठी कृती


१      एक कप मैदा त्यात दोन चमचे बेसन पीठ मिळवून घ्या. एक लहान चमचा मीठ आणि तीन चमचे गरम तेल या सर्वात मिसळवून घ्या. त्यात अर्धा कप पाणी घाला. आपण चपाती करण्यासाठी जसं पीठ मळवून घेतो. त्याचप्रकारे आपल्याला हे मिश्रण मध्यम स्वरुपाचं असलं पाहीजे. या मळलेल्या मिश्रणाला दहा-पंधरा मिनिट झाकून ठेवा.

२      दुसरी कृती करण्यासाठी आपण तयार आहोत. 


गॕसवर तवा किंवा पॕन गरम होण्यासाठी ठेवा. आता त्यात एक चमचा जीरे, दोन-तीन चमचे तीळ, तीन-चार चमचे खोबरे किस, तीन चमचे बारीक कोथिंबीर,एक चमचा जीरे पावडर, एक चमचा धने पावडर, दोन-तीन चमचे लाल पावडर, चार चमचे बारीक शेव,एक चमचा साखर, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे.

३     तिसरी कृती, गुळ- चिंचेचं पाणी 


पॕनमध्ये दोन वाटी पाणी घ्यायचे आहे. गुळ आणि चिंच पॕनमध्ये घालून चांगले मिसळून घ्यायचे आहे. पाच - दहा मिनिट हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यत गॕसवर ठेवायचे.

४      मगाशी मळवून ठेवलेले मिश्रण घेऊन चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे.  लाटलेल्या चपातीवर गुळ-चिंचेचं मिश्रण लावायचं. आता मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला पूर्ण चपातीवर लावावा. लाटलेल्या चपातीचा रोल करून घ्यायचा. दोन्हीही बाजूने अनावश्यक चपातीचा भाग चाकूच्या साहाय्याने कापून टाका. त्या रोलला चाकूच्या साहाय्याने हळूवारपणे कापून घ्यावे. 

५     बारीक कापलेल्या रोल तळुन घ्यावे. तळताना गॕस कमी ठेवावा. कापलेले रोल थोडेसे लालसर झाल्यावर काढून घ्यावी. आपली कुरकुरीत भाकरवडी तयार आहे. 


घरात राहा, सुरक्षित राहा.

आपल्याला आमचा लेख आवडल्यास कमेंट करावे, तसेच मित्रांना, नातेवाईकांना शेअर नक्की करावे. 

5 comments:

IF YOU LIKE OUR POST ,PLEASE COMMENT

Powered by Blogger.