शेती हा आपला महत्वाचा व्यवसाय आहे. शेती करत असताना असंख्य अडचणीला सामोरे जावे लागते. शेतकरी नेहमीच एका चिंतेच्या ओझ्याखाली जगत आलेला आहे. आज शेतकरी पिकवतो म्हणुनच आपण आरामशीर खाऊ शकतो. आपल्या देशाचा आधार एक सीमेवर राहुन आपले रक्षण करणारा जवान आणि दूसरा शेतात राबराब राबणारा शेतकरी जो आपल्याला अन्न पूरवतो.

शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदा
शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदाजो आदर आपण आपल्या जवानांचा करतो,तसाच आदर आपण आपल्या शेतकरी बांधवांचा करायलाच पाहीजे. शेती करत असताना प्रत्येकवेळी शेतकरी आपल्या डोक्यावर बोझा ठेवत जगत असतो. 

परीवारातील सदस्यांना दोन वेळची भाकर, मुलांचे शिक्षण, लग्न आणि सुखाचे जीवन एवढीचतर अपेक्षा असतेना या शेतकरी बांधवांची. 

सर्वात मोठे संकट तर आसमानी संकटच असते. आसमानी संकटाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात खूप समस्या असतात. या समस्यांना तोंड देत असताना त्याची काय अवस्था होते ते समजून घ्यायला अगोदर आपल्याला एक शेतकरी बनून बघावं लागेल. 

मुलांचे शिक्षण, लग्न, पीकाला योग्य भाव न मिळणं, कर्जाची परतफेड, कमी पाऊस यासारख्या अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी करावा लागतो.

शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदा
शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदासर्वकाही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने बरेच शेतकरी बांधव आकाशाकडे टक लावून पाहत असतात. पाणी कमी मिळाले तर पीक येत नाही अनं पीक चांगले आले तर भाव मिळत नाही. आता माझ्या शेतकरी बांधंवानी काय करायला पाहीजे? त्यासाठी आपल्याला शेतीला उपयुक्त असा जोडधंदा करावा लागेल. जोडधंदा करत असताना शेतीच्या पीकावरच अवलंबून राहने बंद होईल.

कुकुटपालन

शेळीपालन

म्हैसपालन

गाय पालन

मासे पालन

खेकडा पालन

आंतरपीक घेऊन भाजीपाला करणे.

जमीनीची मशागत करणे. या साठी लागणारी हत्यारे, अवजारे,बैलजोड, ट्रॅक्टर घेणे.

पारंपरिक लुप्त होणाऱ्या जातीची मशागत करून त्याचे बी विक्री साठी ठेऊ शकता.

शेतकरी बांधवांनो आता वेळ आली आहे ती लढण्याची, आपल्या स्वाभीमानाला योग्य दर्जा देण्याची, आपल्यातील कौशल्य दाखविण्याची. अजुन किती वर्षे निसर्गावर आणि सरकारवर अवलंबून राहणार आहात तुम्ही. हे कुठेतरी थांबलच पाहीजे. होय हे इथेच थांबायला पाहीजे आणि आजपासूनच थांबायला पाहीजे. 

आपल्यातील उणिवा आणि चुका आपणच शोधल्या पाहीजे. आपण आपली विचार करण्याची पध्दत बदलायला पाहीजे. नविननविन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणी वापर करायला सुरुवात केली पाहीजे. शेतीसाठी अनुकुल जोडधंदा निवडून त्यावरही काम करण्याचे प्रत्येक शेतकरी बांधंवानी शिकायला पाहीजे.

शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदा
शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदा


आज आपण व्यापारांना कमी भावात आपला माल विकुन टाकतो. तोच माल ,तो व्यापारी दोन पैशे जास्त मोबदल्यात बाजारात विकतो. 

व्यापारी आज शेतकरी बांधंवापेक्षाही जास्त कमावत आहे तेही कुठलीही मेहनत न करता. आपले शेतकरी बांधव मात्र बसलेच आहे, एकच रट लावून, यंदा मालाला भाव चांगला नाही. 

कसा मिळेल भाव? घरी बसुन तुम्हाला कुणीच चांगला भाव देणार नाही. बाजारात जाऊन बघा तुमचाच माल तुम्हाला काय किंमतीत मिळतोय ते? उद्यासाठी जगायचं असेल तर आज आपल्याला आपली काम करण्याची पध्दत आणि विचार करण्याची पध्दत बदलावी लागेल.

शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदा
शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपुर्ण पर्यायः शेती आणि जोडधंदापिकवलेला माल बाहेर कसा विकता येईल याबद्दल चौकशी करायला हवी. जोडधंदा हा ही चांगला आणि उत्तम पर्याय आहे शेतीसाठी. कुठलाही जोडधंदा निवडुन त्यावर माहीती गोळा करा. 

अगोदर कुणी सुरू केले असेल तर,एकदा आवश्य बघून या. जोडधंदा सुरू केल्यामुळे शेतीत होणारे नुकसान जर असेल तर ते झाकल्या जाते. आपली आर्थिक परिस्थितीला इजा पोहचत नाही. जर आपण फक्त शेती व्यवसायावर अवलंबून राहीलो असतो तर आपले सर्वच नुकसान झाले असते. 

होणाऱ्या नुकसानीमुळे कितीतरी शेतकरी बांधंवानी आजवर आपले प्राण गमावले आहे. हे जर वेळेवर थांबले नाही तर परिस्थिती अजुन गंभीर होण्यास वेळ लागणार नाही.

आत्महत्या केल्यानंतर आपल्या कुटुंबाला काही आर्थिक मदत मिळेल या आशेवर शेतकरी बांधव आपला बळी देतो.  अरे बळी राजा, तु कधी विचार केलास काही रुपयांच्या मदतीने तुझे कुटुंब काय आयुष्यभर त्या मदतीवर आपवि उदरनिर्वाह करतील?

नाही, कधीच नाही. त्यांना आपले उर्वरीत आयुष्य जगण्यासाठी वनवन फिरावे लागेल. जो पर्यंत स्त्रीच्या कपाळावर कुंकू आणि मुलांच्या डोक्यावर बापाचा हाथ असतो, तोपर्यंत त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही.

आत्महत्या करण्याचे विचार मनातून काढुन टाका, आपल्या परीवाराची काळजी करा. फक्त शेतीवरच अवलंबून रहाने कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा. शेतीशिवाय दुसरा व्यवसायबद्दल विचार करा. 

दुग्धव्यवसायही एक चांगला जोडधंदा आहे. यातुन उत्पन्न तर मिळतेच शिवाय खतही उपलब्ध होते. शेती करत असताना गुरांना चाराही सहज उपलब्ध होतो. उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्याने आर्थिक परिस्थितीत देखील सुधारणा होते. शेती करताना,उत्पन्न कमी झाले किंवा हमीभाव नाही मिळाला तरी आपल्या आर्थिक परिस्थितीत काही जास्त फरक पडणार नाही.

दुग्धव्यवसाय किंवा इतर जोडधंदे सुरू केल्यास शेतीमध्ये झालेले नुकसानमुळे आपल्याला फारसा फरक पडणार नाही.

शेती करत असताना नविननविन उत्पन्नाचे स्त्रोताचा शोध घेत राहीले पाहीजे. जीवनात एकाच उत्पन्न स्त्रोतावर अवलंबून रहायला नाही पाहीजे. जीवनात अडचणी विचारून येत नसतात. त्यामुळेच सांगतो उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकडे जास्तीतजास्त लक्ष असू द्या.

शेतीला जोडधंदा नेहमीच एक चांगला पर्याय ठरलेला आहे. पीकांची देवाणघेवाण करत व्यापारीसुध्दा बनण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

शेतकऱ्यांना एक उत्तम जीवन जगण्यासाठी जोडधंदा अत्यंत महत्त्वपुर्ण पर्याय आहे. शेतीला,जोडधंदा हा शेतकरी बांधंवासाठी संजीवनी म्हणुन काम करील यात काही शंका नाही. 


1 comment:

IF YOU LIKE OUR POST ,PLEASE COMMENT

Powered by Blogger.